रत्नागिरी:-पत्नीच्या हातावर सुरीने वार करणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परटवणे, सरोदेवाडी येथे घडली. शंकर दत्ताराम रसाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावं आहे.
गाडीतळ येथे पत्नी घरकाम करण्यासाठी गेलेली असताना त्यांचा पती शंकर रसाळ तिथे आला होता. त्याने फिर्यादी पत्नीला हातांच्या थापटाने मारहाण करून आपल्याकडील धारदार सुरीने शंकरने पत्नीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करुन दुखापत केली होती. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी घरात कोणी नसताना शंकर याने दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. थोड्यावेळाने नातेवाईक घरी आल्यावर त्यांना हा प्रकार दिसला. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णल्यात पाठवला. या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
अखेर ‘त्याने’ स्वतःलाही संपवले
