दापोली:-माणुसकीला काळीमा फासणारी घटना दापोली येथे घडली होती. विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या बळजबरी करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्निल मनोज मोरे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली येथील महिला बकऱ्या चरविण्यासाठी जंगलात गेली असताना तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न स्वरूप मनोज मोरे याने केला. पीडित महिला ही या जंगलमय भागात बकऱ्या घेऊन गेली होती मोरे याने वाईट हेतूने पीडित महिलेचा हात धरून, तोंड दाबून, मानेला धरून जमिनीवर पाडले, तसेच तिला ओढत जंगलात घेऊन गेला. पीडित महिलेने विरोध केला असता तिला दगडावर आपटून दगडाने मारून जखमी केले. जवळ असलेल्या लाईटरने पीडित महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिची साडी पेटवली. यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे. महिलेच्या डोक्याला चेहऱ्याला हाताने गंभीर दुखापत झाली होती. तसेच पायाला भाजून जखम झालेली आहे. याप्रकरणी आरोपी स्वरूप मोरे याच्यावर भा द वि क 307, 354, 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मोरे याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
दापोलीत महिलेचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 14 दिवस न्यायालयीन कोठडी
