नवी दिल्ली:-भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून 3 कसोटी जिंकून मालिका विजय मिळवला आहे. टीम इंडियासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य इंग्लंडने ठेवले होते. भारतीय संघाला चौथ्या दिवशी विजयासाठी 152 धावा कराव्या लागणार होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या बिनबाद 40 होती. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल नाबाद यांनी डावाला बाझबॉल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र आज चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात निराशाजनक कामगिरी झाली. सकाळच्या सत्रात भारताने लागोपाठ ३ फलंदाज गमावले. लांच नंतर आणखी दोन गडी बाद करण्यात इंग्लंड संघाला यश मिळाले. भारतीय संघाचे 5 गडी बाद होताच निराशाजनक वातावरण झाले होते. मात्र जिरेल आणि गिलने कठीण काळात संयमी खेळी करत विजय प्राप्त केला. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि भरत यांच्या विकेट मुळे भारताच्या गोठात निराशेचे वातावरण होते. परंतु गील आणि जूरेल यांनी डाव सावरत टीम इंडियाला विजय प्राप्त करून दिला. यामध्ये शुभमन गिल 52 धावा करत विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सणसणीत दोन षटकार खेचत विजय समीप धावा नेऊन ठेवल्या. मात्र शेवटच्या दोन जुरेल याने काढत विजय प्राप्त केला. जिरेल याने 39 धवांची महत्वपूर्ण खेळी केली. याच जोरावर टीम इंडियाचा विजय झाला.
रांची कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ब्रिटीशांना 46 धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारतीय संघाला 192 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ५ गडी राखून सामना खिशात घातला. 5 कसोटी सामन्यात 3-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.