गुहागर/उदय दणदणे:-विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत विविध प्रकारच्या स्पर्धा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यात वक्तृत्व स्पर्धा म्हटली की मंच, समोर पालक,मान्यवर मंडळी आणि गुणांकन करणारे शिक्षक,अशा सर्व उपस्थितांसमोर धीट मनाने भाषण करणे विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हानचं असते,मात्र स्पर्धेचा विषय आणि त्या अनुसरून सहभागी होणाऱ्या मुलांचं वाचन व बोलण्याचा सराव करुन घेणे यात शिक्षकांचं मार्गदर्शनही फार महत्वाचे असते,अशीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी वक्तृत्व स्पर्धा “कुणबी समाजोन्नती संघ-पालशेत” यांच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी,शिवजयंती चे औचित्य साधत जि.प.शाळा पालशेत (मारुती मंदिर) येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ६ शाळा सहभागी होत,लहान गट १ ली ते २ री- १३ विद्यार्थी व मोठा गट ३री ते ४ थी-२३ विद्यार्थी,अशा एकूण ३६ विद्यार्थी मुले-मुली सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत मोठा गटातून जि.प.प्रा. शाळा-निवोशीच्या इयत्ता ४ थीच्या विद्यार्थी कु.समिक्षा शशिकांत लोखंडे हीने प्रथम क्रमांक तर कु.सेजल सुनिल सोलकर हिने द्वितीय क्रमांक पटकावून विजयी होत निवोशी गावचा बहुमान उंचावला आहे.सदर प्रति विजयी विद्यार्थी व शाळेचे आदर्श शिक्षक/ मुख्याध्यापक विजय राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन,शुभेच्छा सह कौतुक होत आहे.