रत्नागिरी / प्रतिनधी:-तालुक्यातील र. ए.सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशाला येथे स्काऊट संस्थापक दिन व जागतिक चिंतन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल व त्यांच्या पत्नी लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर जागतिक चिंतन दिन तसेच स्काऊट संस्थापक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उभयतांचा जन्मदिवस एकाच दिवशी येत असल्याने त्यादिवशी संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येत असतात रा.भा. शिर्के प्रशाला येथे यानिमित्ताने गप्पा – टप्पा ,वक्तृत्व स्पर्धा ,गीत गायन , गॅजेट मेकिंग फनी गेम्स आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी लाठी -काठी , कराटे आदी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली . स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे मुख्याध्यापक श्री. आर बी चव्हाण ,उप मुख्याध्यापक श्री के.डी. कांबळे पर्यवेक्षिका सौ पी एस जाधव , कराटे प्रशिक्षक श्री अरुण बने स्काऊट विभागप्रमुख श्री प्रशांत जाधव यांनी कौतुक केले. यावेळी प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या गुण गौरव करण्यात आला .सदर कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रशालेतील स्काऊट गाईड्स कडून बौद्ध , जैन , ख्रिश्चन , मुस्लिम व हिंदू धर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट विभाग प्रमुख प्रशांत जाधव सूत्रसंचालन गाईड कॅप्टन सौ एस. के. पवार तर आभार प्रदर्शन स्काऊट प्रशिक्षक युवराज महाले यांनी केले .