रत्नागिरी:-येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा आणि शिर्के प्रशालेतर्फे येत्या सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार पस्तिसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून वॉकेथॉनचे आयोजन केले आहे.
वॉकेथॉन सर्वांसाठी खुले असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वी शिर्के हायस्कूल येथे उपस्थित राहावे. कार्यक्रम वाहतूक नियम व रस्ते सुरक्षा या महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाहन वितरक, मोटार ट्रेनिंग स्कूल, संघटना प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक-मालक संघटना, प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व पीयूसी केंद्र चालक, असोसिएशन प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वाहतूक संघटना प्रतिनिधी, जिल्ह्यातील नागरिकांनी त्यामधअये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.