खेड:-भारतीय लष्करात असलेले खेड तालुक्यातील आस्तान गावचे सुपुत्र सुभेदार अजित अशोकराव मोरे (वय ४२) यांना लेह-लडाख येथे तीव्र हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ते अविवाहित होते.
आस्तान, तिसंगी ही गावे सैनिकी परंपरा लाभलेली आहेत. अशा गावातील सुभेदार अजित मोरे यांना वडिलांकडून सैन्याचा वारसा लाभला होता. वडील निवृत्त सैनिक आहेत. दि. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे अजित मोरे यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यात आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, आजोबा असा परिवार आहे.