मुबंई/उदय दणदणे:-कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य नियोजित,समस्त कुणबी समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधात ( मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कुणबी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करू देण्याच्या शासन निर्णया विरोधात मंगळवार दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी,विधान भवनावर “दे धक्का मोर्चा काढण्यात आला होता.
सदर मोर्चात कोकणातील गुहागर तालुक्याचे विशेष आकर्षण असलेले नमन- खेळयांतील संकासुर व कुणबी नांगरधारी शेतकरी हे मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले. समाजनेते रविंद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमन ह्या लोककलेतून कोकणच्या नमन कलासंस्कृतीने शासनाचे लक्ष वेधण्यात आले.ह्यात कलाकार संकासुर वेशभूषेत प्रशांत भेकरे (गुहागर) शेतकरी वेशभूषेत सुभाष बांबरकर(रत्नागिरी) संदिप कानसे, बबन कांबळे,उदय दणदणे,अमित काताळे,संजय कळबाटे,सदाशिव गोणबरे आदी गुहागर तालुक्यातील नमन कलाकार सहभागी झाले होते.