राजापूर:-संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन राजापूर नगरपालिकेने उपाययोजना सुरू केली आहे. आता पाण्याचा अपव्यय करणार्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. राजापूर शहरात पाण्याचा कोणी अपव्यय करताना दिसून आल्यास त्याची नळ जोडणी कोणतीही पूर्वकल्पना न देता तोडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गेल्यावर्षी राजापूर शहरातून वाहणार्या अर्जुना व गोड्या पाण्याच्या कोदवली नदीतील गाळ उपसा करण्याबरोबरच कोदवली येथील सायबाच्या धरणातील गाळ उपसाही करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची झळ बसणार नाही असे वाटत होते. मात्र वातावरणात दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता पाहता पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.