मुंबई:-महाराष्ट्रातील 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेसाठी नामांकन मागे घेण्याची आज, मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. परंतु, इतर कुठलेही नामांकन आले नाही.
त्यामुळे या 6 जणांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहेत.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्यांमध्ये भाजपचे 3, शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ अजीत गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच राजस्थानातून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतचभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची गुजरातमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. तर मध्य प्रदेशातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर, तर काँग्रेसचे अशोक सिंह यांचा समावेश आहे. यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.