डेरवण येथील रूग्णालयात अवघड शस्त्रक्रीया यशस्वी
चिपळूण प्रतिनिधी:-ऐकावं ते नवलच या म्हणीचा प्रत्यय पाहायला मिळाला. माशाचा घशात अडकलेला 4 सेंटिमीटर काटा अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून बाहेर काढण्याची किमया वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे.
त्याचे घडले असे की, रुग्णाच्या घशात दोन महिन्यापूर्वी माशाचा काटा अडकला होता. त्यानंतर त्या रुग्णाला अन्न गिळताना खूप त्रास होत होता. त्यामुळे घशाला सूज येऊन लागली. डॉ. ओंकार शर्मा यांनी रुग्णाला वालावलकर रूग्णालयामध्ये एम आर आय व सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवले. वालावलकर रूग्णालयामध्ये सिटी स्कॅन केल्यानंतर घशात माशाचा हाड स्वरयंत्रा नजीक अडकलेला दिसला. त्यानंतर डॉ. आनंद जोशी (गेस्टएन्ट्रोलॉजिस्ट सर्जन), सर्जरी विभागाचे डॉ. मानसिंग घाटगे (डीन), डॉ अविनाश सुरुषे (सर्जन), डॉ. संग्राम दाभोळकर (सर्जन), ईएनटी विभागाचे डॉ. प्रतीक शहाणे (ईएनटी सर्जन) यांनी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
स्वरयंत्रानजीक घशामध्ये अडकलेले माशाचे हाड काढण्याची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पडून 4 सेंटिमीटर घशात रुतलेला माशाच्या काट्याचा तुकडा बाहेर कढण्यात यश आले.
शात्रक्रियेनंतर त्वरित रुग्णाला जेवता आले आणि दोन महिने त्रास होत असलेली अन्ननलिका उघडली गेली म्हणून रुग्णाने व त्यांच्या नातेवाईकाने रुग्णालयांचे व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया कान नाक व घसा विभागाचे तज्ञ डॉ. प्रतीक शहाणे (ईएनटी सर्जन), डॉ. राजीव केणी (ईएनटी सर्जन) व डॉ. सीजा (ईएनटी सर्जन) यांनी पार पडली.
या अवघड अशा शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे काम भुलतज्ञ डॉ. लीना ठाकूर, डॉ.संदीप राव, डॉ. प्राची रबडे व डॉ. केयूर पटेल यांनी केले.