नवी दिल्ली:-भारतीय वंशाच्या एका 24 वर्षीय तरुणाचे नाव सद्या अमेरिकेत चर्चेत आहे. कारणही तसेच आहे. कारण भारतीय-अमेरिकन नागरिक अश्विन रामास्वामी हा विधानसभेची निवडणूक लढत आहे. हा तरुण अमेरिकन विधानसभेसाठी निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन आहे. अमेरिकेतील जॉर्जिया सिनेटच्या जागेवरून तो निवडणूक लढवत आहे. तो डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार आहे रामास्वामी
जर तो निवडणूक जिंकला तर जॉर्जिया विधानमंडळातील तो पहिला भारतीय अमेरिकन बनणार. रामास्वामीने सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, निवडणूक सुरक्षा आणि तंत्रज्ञान कायदा आणि धोरण संशोधनात शिक्षण घेतलं आहे. लोकांना शिक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात असे त्याला वाटते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या समुदायासाठी राज्य सिनेटची निवडणूक लढवत आहे. मला हे सुनिश्चित करायचे आहे की प्रत्येकाला समान संधी मिळाल्या आहेत. मला खात्री आहे की समुदायाला एक नवीन आवाज आहे. तरुण राजकारणात आल्यावर प्रतिनिधीत्व वाढते. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळण्याची खात्री करणं आवश्यक आहे. नोकऱ्यांसोबतच लोकांना इतर हक्कही मिळावेत, अशी माझी इच्छा आहे, असे रामास्वामीने सांगितलं.
तो म्हणाला की, मी हिंदू आहे. मला आयुष्यभर भारतीय सांस्कृतिक तत्त्वज्ञानात खूप रस होता. मी चिन्मय मिशन बालवाडीत गेलो, जिथे मी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारखी महाकाव्ये शिकली. मी कॉलेजमध्ये असताना संस्कृत शिकलो. मी सर्व प्राचीन ग्रंथ वाचले आहेत. मला उपनिषदे वाचण्याची खूप आवड निर्माण झाली. माझे संपूर्ण आयुष्य योग आणि ध्यानात गेले. आता मी हे ज्ञान नवीन तरुणांपर्यंत पोहोचवत आहे.
रामास्वामीचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूतून अमेरिकेत स्थायिक झाले. आई चेन्नईची तर वडील कोईम्बतूरचे आहेत. दोघंही आयटी क्षेत्रात काम करतात. Gen-Z हा शब्द सोशल मीडियावर चर्चेत आला. याचा अर्थ 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेला मुलगा किंवा मुलगी.