फुणगूस/इकबाल पटेल:-संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील प्रसिद्ध दर्गा हजरत शेखजाहीर शेखपीर चा उर्स उत्सव दिनांक 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असा चार दिवसीय कालावधीत साजरा केला जाणार असून त्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस निरक्षक नीलकंठ बगळे यांनी दर्गाव्यवस्थापक,जमात चे पदाधिकारी व ग्रामस्थांची दर्गेत बैठक घेतली.
हिंदू -मुस्लिम धार्मियांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या व दरवर्षी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होणाऱ्या येथील उर्स उत्सवला जिल्हा तसेच राज्यच नव्हे तर परराज्यातूनही येणाऱ्या भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असते.तरी या उत्सवात येणाऱ्या भाविकाकंडून व आपल्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडून गालबोट लागणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेत शांततेत उर्स उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरक्षक नीलकंठ बगळे यांनी यावेळेस उपस्थितांना केले.
तसेच सोशल मीडियावर कोणताही संदेश प्रसारित करताना त्या प्रसारित करण्यात येणाऱ्या संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा किंव्हा दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेऊनच सोशल मिडीया चा वापर करण्याच्या सूचनाही पोलीस निरीक्षक बगळे यांनी केले.
या वेळी त्यांच्या सोबत हेड कॉन्सटेबल किशोर ज्योशी,हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर , डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्सटेबल शांताराम पंदेरे हे उपस्थित होते तर या बैठकीला दर्गा व्यवस्थापक नूर मोहम्मद मुजावर, मुजम्मील मुजावर, फुणगूस मोहल्ला जम्मात चे अध्यक्ष मुनीर खान, मैनूद्दीन मापारी, पत्रकार इकबाल पटेल, अस्लम सोलकर, हनिफ खान, मुनीर खान, यासिन पटेल, पोलीस पाटील प्रशांत थुळ,हनिफ खान, हनिफ नाईक, मजफ्फर खान, दानिश खान, कादर खान,अबूबक्कर खान, इस्माईल खान आदी उपस्थित होते.तसेच हनीफ खान. हनीफ नाईक. मुजफ्फार खान. नसीरभै यांचे शिष्य कादिर खान, सुलतान नाईक, दनीश, खान, शेवटी मुनीर खान यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेली.