कोंकण प्रादेशिक पक्षाची फलकबाजी ठरतेय लक्षवेधी
महामार्गासह हातखंबा, रत्नागिरी शहरात लावलेत फलक
चिपळूण:-मुंबई – गोवा महामार्गचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग असे नाव देण्यात यावे अशी मागणी करणारे फलक सद्या महामार्गावर झळकत आहेत. तसेच हातखंबा, खेडशी, करवांचीवाडी, शिवाजीनगर, टीआरपी भागात हे फलक लावण्यात आले आहेत. शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सोमवारी कोंकण प्रादेशिक पक्षाने लावलेले फलक लक्षवेधी ठरत आहेत.
या फलकांवर मुंबई-गोवा महामार्गाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मुंबई-गोवा महामार्ग राहणार असे नमूद करण्यात आले आहे.
अनेक वर्षे महामार्गचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र काम पूर्ण झाल्यावर त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे.