गुहागर:-मानवतेला काळीमा फासणारी घटना गुहागर तालुक्यात घडली आहे. चक्क प्रौढाने एका अल्पवयीन मुलाशी लैंगिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. ही घटना 31 जानेवारी 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडल़ी. याबाबत मुलाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
सुशील राघो येलवे (45, ऱा गुहागर) असे संशयिताचे प्रौढाचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम 452 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुशील येलवे याला अटक करण्यात आल़ी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी 2024 रोजी पीडित 15 वर्षीय मुलगा हा नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबियांसमवेत झोपी गेला होत़ा. रात्रीच्या सुमारास सुशील येलवे याने घरामध्ये प्रवेश केल़ा. ज्या ठिकाणी तो मुलगा झोपला होता त्याठिकाणी आल़ा. मुलगा गाढ झोपल्याचा फायदा उठवत येलवे याने त्याच्याशी गैर वर्तन करण्याचा प्रयत्न केल़ा. यावेळी मुलाला जाग आली. आपल्याबरोबर काहीतरी विचित्र घडतय याची जाणीव झाली. तो खडबडून जागा झाला. त्याने गैरप्रकाराला विरोध केला आणि जोराने किंचाळल़ा. अचानक मुलाच्या ओरडण्याच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले.
यावेळी आपण पकडले जावू या भीतीने संशयित येलवे याने घरातून पळ काढल़ा. याचदरम्यान पिडीत मुलाच्या बहिणीने संशयित याला पळताना पाहिल़े. या प्रकाराने सारेच गोंधळून गेले. घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल़ा. त्यानुसार पिडीत मुलाने आपल्याबाबत घडलेली हकीगत पोलिसांपुढे कथन केली तसेच संशयिताविरूद्ध तक्रार दाखल केल़ी. पोलिसांनी यापकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल़ा. पोलिसांच्या तपासात हा प्रकार सुशील राघो येलवे (45) यानेच केल्याचे निष्पन्न झाल़े. त्यानुसार पोलिसांनी सुशील येलवे याला अटक केल़ी.