रत्नागिरी:-भारत सरकारने आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील रत्नागिरी शहरातील वेळापत्रक जाहीर झाले आहे.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम आखण्यात आली आहे.
ही देशव्यापी मोहीम १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये ९ ते ११ आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ५ ते ७ या वेळेमध्ये राबविणार आहे. या मोहिमेमध्ये विविध योजनांकरिता पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे इत्यादी उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत.
या यात्रेमध्ये शहरी भागात केंद्र शासनाच्या विविध विभागाकडील पीएम स्वनिधी योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम स्वच्छ भारत अभियान (शहरी) योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम सुरक्षा बीमा योजना, मुद्रा लोन, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी योजनांची माहिती जनतेला देण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासन, नगरविकास विभाग व इतर विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेततर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील यात्रेचे वेळापत्रक असे – १९.०२.२०२४ : सकाळी ९.०० ते ११.०० – कोकण नगर, नगर परिषद २१ नंबर शाळा. संध्याकाळी : ५.०० ते ७.०० – क्रांती नगर, महालक्ष्मी मंदिरसमोर. २०.०२.२०२४ : सकाळी : ९.०० ते ११.०० – शनिवार आठवडा बाजार, औदुंबर हॉटेलसमोर, संध्याकाळी : ५.०० ते ७.०० – राजिवडा : फिशरीज हायस्कूल. २१.०२.२०२४ : मारुती मंदिर, सावरकर नाट्यगृह परिसर, सकाळी : ९.०० ते ११.००. संध्याकाळी : ५.०० ते ७.००.- माळनाका, नगर परिषद व्यायामशाळा. २२.०२.२०२४ : मुरूगवाडा : शाळा क्रमांक २० येथे, सकाळी : ९.०० ते ११.००. संध्याकाळी : ५.०० ते ७.००. – झाडगाव, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.