खेड / प्रतिनिधी:-खेड-भरणे मार्गावरील आठवडाबाजारनजीक 2 लाख 77 हजार 426 रूपयांचा गुटखा व 10 लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक जप्त केला. याप्रकरणी अरविंद पंडित पवार (36, मूळगाव बांबवडे-सांगली, सध्या रा. गोवा) यास अटक केली आहे.
सद्यस्थितीत मटका जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्याचे पोलिसांचे सत्र सुरू आहे. दीड महिन्यापूर्वा मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे – चिरणीफाटा येथे टेम्पोसह 7 लाखां गुटखा जप्त केला होता. गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक केल्यानंतर आणखी एका सहभाग असल्यो उघड झाले होते. त्यानुसार 3 लाख रूपये किंमताचया अल्टो कारसह 29 हजाराचा गुटखाही जप्त केला होता.
ही कारवाई ताजी असताना एम.एच. 010/बी.आर.7471 कमांकाया आयशर ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचया मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांचया पथकाने भरणे – आठवडाबाजारनजीक सापळा रचला. त्यानुसार आयशर ट्रक घटनास्थळी आल्यानंतर पथकाने थांबवून तपासणी केली. या झडतीत 2 लाख 77 हजार 426 रूपये किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी अरविंद पंडित पवार यास गजाआड करण्यात आले. पथकात पोलीस हवालदार दीपक गोरे, महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, रोहित जोशी, संदीप ािाले, कृष्णा बांगर यां समावेश होता. हा गुटखा नेमका कुठून आणला, या कसून तपास येथील पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुटख्यो गोवा कनेक्शन असल्यो तपासात निष्पन्न झाले आहे. यादृष्टीने तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. या गुटखा विकीपकरणात आणखी कोणा सहभाग आहे का? याही सखोल तपास केला जात आहे. याबाबता अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.