मंडणगड:- राज्यात समग्र शिक्षांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमास मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ तपासणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.
मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद सेंट्रल स्कूल पणदेरी उर्दू शाळेत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना समग्र शिक्षांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. शाळेत प्रशिक्षण सुरू असून ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ तपासणी समितीचे पदाधिकारी सोवेली केंद्रप्रमुख महेंद्र वळवी, मुख्याध्यापक इंद्रजित अवताडे, केंद्र मुख्याध्यापक संतोष करावडे यांनी भेट शाळेला दिली. मुख्याध्यापक बशीर परकार, तायक्वांदो प्रशिक्षिका सौ. काजल लोखंडे, विश्वदास लोखंडे, शिक्षक मन्सूर वलेले, अखिल बुरूड, तन्वीर परकार आदी उपस्थित होते.