किशोर पवार/ कळझोंडी:-रत्नागिरी तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा जांभारी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ५ वर्ग खोल्यांच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उद्योगमंत्री मा.नामदार उदय सामंत यांच्या हस्ते नामफलकाच अनावरण व फीत कापून मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
याप्रसंगी जि.प.माजी सभापती बाबूशेठ म्हाप,ॠतुजा जाधव,माजी जि.प.सदस्य बाबूशेठ पाटील,पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश साळवी,सौ मेघना पाष्टे,गटविकास अधिकारी जे.पी.जाधव,तहसिलदार राजाराम म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर,उपविभाग प्रमुख अजिम चिकटे,सरपंच आदेश पावरी,उपसरपंच सुधिर वासावे मुख्याध्यापिका आकांशा भुर्के सहकारि शिक्षक ग्रामस्थ बंधु भगिनी आदी शिक्षणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी नामदार उदय सामंत यांची ढोल-ताश्यांच्या गजरात व लेझीमच्या नृत्यावर फटाके वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. समस्त गावाच्या वतीने ना.उदय सामंत यांचा भव्य पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ना.सामंत म्हणाले,जांभारी गावाने माझे व माझ्या कुटूंबावर प्रचंड प्रेम केले आहे. संपूर्ण गावाचा विकास करण्यास आपण कटिबद्ध आहोत.स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्यासाठी सर्व ग्रामस्थानी एकजुटीने सहकार्य द्यावे ,असे आवाहन ना.सामंत यांनी केले.जांभारी वासियांच्या प्रेमाने ना.सामंत हे भारावून गेले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते संजय बैकर यांनी प्रास्ताविक व आभार उपसरपंच सुधीर वासावे यांनी मानले.