रत्नागिरी:-6 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर कोदवली पेट्रोल पंपासमोर वारिशे यांचा आंबेरकर याने गाडीखाली चिरडून खून केला होता असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आह़े. आंबेरकर हा स्वतला प्रस्तावित रिफायनरी समर्थक म्हणून सांगत होत़ा. बारसु परिसरात रिफायनरी होऊ घातलेल्या जागेचे व्यवहार करण्याचे काम पंढरीनाथ आंबेरकर करत होता असा आरोप रिफायनरी विरोधकांकडून केला जात आह़े. पत्रकार वारिशे हे सातत्याने रिफायनरी विरोधातील स्थानिकांची बाजू आपल्या वर्तमानपत्रातून मांडत असल्याने ही बाब आंबेरकर याला खटकत होती असे तपासात समोर आले आह़े.
राजापूरातील पत्रकार शशिकांत वारिशे हे 6 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 च्या सुमारास राजापूर पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडले होत़े यावेळी पंढरीनाथ वारिशे याने महिंद्रा थार गाडीने वारिशे याच्या ताब्यातील दुचाकीला धडक दिल़ी. या अपघातात वारीशे हे गंभीर जखमी झाल़े त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होत़े त्याठिकाणी खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना वारिशे यांचा मृत्यू झाला होता अशी तकार पत्रकार वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसात थार गाडीचा चालक आंबेरकर याच्याविरोधात दाखल केली होती.
पोलिसांनी आंबेरकर याच्याविरोधात सुरूवातीला भादंवि कलम 308 व 304 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. तसेच 7 फेब्रुवारी रोजी आंबेरकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान या अपघाती मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. वारिशे यांचे नातेवाईक व रत्नागिरीतील पत्रकार यांनी आंबेरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होत़ी पोलिसांच्या तपासामध्ये आंबेरकर याने जाणिवपूर्वक वारिशे यांच्या गाडीला धडक दिल्याचे उघड झाल़े.
6 तारखेलाच वारीशे यांनी आपल्या वर्तमानपत्रात आंबेरकर याच्याविरूद्ध बातमी प्रसिद्ध केली होत़ी याचाच राग मनात ठेवून आंबेरकर याने वारीशे यांचा काटा काढला असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला होत़ा दरम्यान या घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी वाघमारे आल़ा तसेच राज्य शासनाकडून यापकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आल़ी या तपासामध्ये अपघातातील थार गाडी ही पंढरीनाथ आंबेकर याच्या नावावर असल्याचे समोर आल़े.
दरम्यान पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने झालेला नसून पुन्हा नव्याने तपास करण्यात याव़ा तसेच रिफायनरी कंपनी व आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यात काही आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व खासदार विनायक राऊत यांनी केला आह़े. तसेच रिफायनरी कंपनी व आंबेरकर यांची बँक खाती तपासण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आल़ी.