चिपळूण:-दुचाकी स्वराने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून ऍपे गाडीला पाठीमागून धडक दिल्याची घटना शनिवारी खडपोली, तिवरे मार्गावर घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघटप्रकरणी सोमवारी दुचाकीस्वरावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश रामा घाणेकर (50, पोफळी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद गगनेश चंद्रकांत पटेकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश घाणेकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने खडपोली गावातून येणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरुन तिवरे ते चिपळूण जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून जात होता. या दरम्यान तिवरे ते चिपळूण या मार्गावरून जाणाऱ्या ऍपे गाडीच्या पाठीमागील गार्डला डाव्या बाजूस जोरदार ठोकर दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. शिवाय दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी दुचाकीस्वार अंकुश घाणेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.