हग डे साजरा करणे पडले महागात;हग डे साजरा होणार पोलीस स्थानकात
रत्नागिरी:-मुलीचा हात पकडल्याच्या रागातून दोन गटातील तरुणांमध्ये राडा झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोगटे कॉलेज समोरील रस्त्यावर ही जोरदार हाणामारी झाल़ी. या मारहाणीत दोन्ही बाजूकडील चौघे जण जखमी झाले आहेत. परस्पर विरोधी तक्रार शहर पोलिसांत करण्यात आल़ी आहे. त्यानुसार पोलिसांनी एकूण 15 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आहे.
फेब्रुवारी महिन्यात रोज डे, प्रपोज डे, हग डे असे विविध डेज साजरे केले जात आहेत़. सोमवारी ‘हग डे’ (एकमेकांना मिठी मारण्याचा दिवस) साजरा केला जात होत़ा. यावेळी ओम गणेश नागवेकर (20, ऱा कर्ला रत्नागिरी) याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अजिंक्य शिंदे या तरूणाने ओम याच्या मैत्रिणीचा हात पकडला होत़ा. ही बाब ओम याला समजताच ओम याने ‘माझ्या मैत्रिणीचा हात तू का पडकलास’ असा जाब अजिंक्य शिंदे याला विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेल़े.
ओम याच्याशी झालेला वाद अजिंक्य याने आपल्या आई-वडीलांना घरी गेल्यानंतर सांगितल़ा. आपल्या मुलाशी झालेला वादाचा राग मनात ठेवून अजिंक्य याचे वडील, आई व अन्य 4 ते 5 जण 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालय परिसरात दाखल झाल़े. यावेळी ओम हा महाविद्यालयातून बाहेर येताच त्याला हाताच्या ठोशाने मारहाण करण्यात आल़ी तसेच धकलाबुकली करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल़ी अशी तक्रार ओम नागवेकर याने शहर पोलिसांत दाखल केल़ी.
तर अजिंक्य याचे वडील संतोष शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ओम व अजिंक्य याच्यात झालेल्या वादाविषयी विचारणा करण्यासाठी संतोष शिंदे हे महाविद्यालय परिसरात गेले होत़े. यावेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथून बाहेर येत असताना ओम याने लोखंडी वस्तूने संतोष शिंदे यांच्या डोळ्यावरील भागात दुखापत केल़ी तसेच अन्य सात ते आठ जणांनी हाताच्या थापटाने व लाथा बुक्क्यांनी संतोष यांना मारहाण करून जखमी केल़े. यावेळी संतोष यांची पत्नी मध्ये आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आल़ी अशी तक्रार संतोष शिंदे यांच्याकडून दाखल करण्यात आल़ी.
संतोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ओम नागवेकर, त्याचे मामा झापडेकर, वडील (ऱा कर्ला ) व इतर सात ते आठ इसमाविरूद्ध भादंवि कलम 143,147,149,324,323,504,506 नुसार गुन्हा दाखल केल़ा. ओम याने दाखल केलेल्या तकारीनुसार अजिंक्य शिंदे, त्याचे वडील, आई व अन्य दोघा जणांविरूद्ध भादंवि कलम 143,147,149,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.