राजापूर:-रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन संलग्नित तायक्वांदो अकॅडमी राजापूरच्या तीन खेळाडूंनी राष्ट्रीय पंच परीक्षेत पी क्लास श्रेणी संपादन करत राजापूरच्या नावलौकिकात भर टाकली आहे.
कर्नाटक तायक्वांदो असोसिएशन, अंतर्गत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नुकतीच कर्नाटक येथे राष्ट्रीय क्यूरोगी पंच सेमिनार / राष्ट्रीय क्यूरोगी पंच रिपेशर कोर्स / राष्ट्रीय पूमसे जज रिपेशर कोर्स आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेत तायक्वांदो अकॅडमी राजापूरच्या श्रुतिका विजय मांडवकर हिने राष्ट्रीय क्यूरोगी पंच रिपेशर कोर्स व राष्ट्रीय पूमसे जज रिपेशर कोर्स, अंश राजन गुंड्ये याने राष्ट्रीय पूमसे जज रिपेशर कोर्स व हितेंद्र तानाजी सकपाळ याने राष्ट्रीय क्यूरोगी पंच रिपेशर कोर्स यामध्ये विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून पुमसे आंतरराष्ट्रीय पंच व 7 दान ब्लॅक बेल्ट मास्टर राजेश्वर मैतेई, क्लास 1 क्यूरोगी आंतराष्ट्रीय पंच 6 दान ए.टी.राजीव तसेच बी. एम. कृष्णमूर्ती यांनी काम पाहिले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशवरराव कररा, प्रविण बोरसे, सुभाष पाटील व सर्व पदाधिकारी यांच्यासह रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण के, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजीत तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, कोषाध्यक्ष सौ.मानसी दिवटे, सदस्य संजय मांडवकर, दीपक धालवलकर, संदीप राऊत, अद्वैत अभ्यंकर, निलेश राहटे, दीपिका पवार व राजापूर तालुक्यातील सर्व तायक्वांदो प्रेमी व पालक वर्ग खेळाडू यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे प्रमुख प्रशिक्षक मुकेश नाचरे मार्गदर्शन करत आहेत.