रत्नागिरी:-शहरातील माळनाका परिसरातील चार दुकाने चोरट्यांनी फोडून मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रयत्न केल़ा. ही घटना गुरूवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल़ी चोरी केलेल्या दुकानांमध्ये रोकड कमी असल्याने चोरट्यांच्या हाती केवळ चार हजार रूपयेच लागल्याची माहिती समोर आली आह़े. दरम्यान चोरटे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आह़े.
मिळालेल्या माहितीनुसार माळनाका परिसरात नव्याने सुरू झालेल्या महाराजा व अन्य दुकाने चोरट्यांनी फोडल्याचा पकार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आल़ा. चोरी झाल्याचे समजताच दुकान मालकांच्या पायाखालची वाळूच सरकल़ी. यावेळी काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही तपासण्यात आल़े. त्यामध्ये 8 तारेखच्या रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरटे हे दुकानात शिरून कपाट उचकटण्याचा पयत्न करत असल्याचे दिसून आल़े.
सुदैवाने दुकानांमध्ये रोख रक्कम अधीक पमाणात नसल्याने चोरट्यांच्या हाती केवळ चार हजार रूपये लागल़े. पोलिसांच्या माहितीनुसार चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याचे समजून येत आह़े. पोलिसांकडून या चोरट्यांचा सकाळपासूनच शोध घेण्यात येत आह़े. तसेच चोरटे जिह्याबाहेर पसार होण्याआधीच त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून पथक तयार करण्यात आले. असल्याचे सांगण्यात येत आहे.