चिपळूण (प्रतिनिधी) : वंचित आघाडीची चिपळूण तालुक्याची बैठक रेस्टहाउस कापसाळ येथे संपन्न झाली. चिपळूण तालुक्यातुन बहुसंखेने कार्यकरते सभासद सदर बैठकीला उपस्थित होते.
तालुका प्रमुख महेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रतिनिधि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाष जाधव उपस्थित होते. चिपळूण तालुका उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, उपाध्यक्ष नाना सावंत, जिल्हा सदस्य शांताराम सावंत, उपाध्यक्ष राजेश मोहिते, कोषाध्यक्ष सुरेश भिसे यांनी महत्वाच्या विषयावर चर्चा करुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तालुका प्रमुख महेश सकपाळ यांनी बोलताना सांगितले की, येणारी लोकसभा, विधानसभेची निवडणुक आपल्यासाठी खुप महत्वाची आहे. कार्यकर्त्यांनी गाफिल रहाता कामा नये. सविधान धोक्यात आलेले आहे. सविधान आपले बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी अथक प्रयत्न करुन लिहिलेलं आहे. सविधानाची समता स्वातंत्रता बंधुता ही मूल्य पायदली तुड़विली जात आहेत. सविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. सविधान वाचविण्यासाठी आपले नेते पक्ष प्रमुख स्रध्येय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रयन्ताची पराकाष्टा करीत आहेत. आपण सर्वानी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाची महाराष्ट्रामधे महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर सुद्धा महाविकास आघाडी वंचित आघाडीला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतील अशी आशा आहे.
या बैठकीला दीपेश सावंत, अशोक गमरे, राजेन्द्र जाधव, ललेश कदम, उत्तम जाधव, प्रसन्ना मोहिते, आकाश कांबळे, अजय गमरे, दीपेश जाधव, अशोक पवार, सुरेश सावंत, अजय पवार, विजय कांबळे, रितेश गायकवाड, राजन जाधव, रविंद्र मोहिते, विशाल मोहिते, संगम गमरे, सतीश जाधव, अमोल कांबळे, सचिन मोहिते, आशीष कांबळष, विजय पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव विलास मोहिते यांनी केले.