रत्नागिरी : जल सुरक्षा आणि पर्यावरण परिवर्तनाबाबत पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याकरिता दोन दिवसीय कार्यशाळा रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या उपस्थितीत झाली.
भारत-जर्मन द्विपक्षीय प्रकल्पांतर्गत जर्मनीतील GIZ कंपनीच्या सहकार्याने भारतातील ग्रामीण भागात जलसुरक्षा व पर्यावरण परिवर्तन या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत करण्याचे ठरविण्यात आले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय जल अभियान (जलशक्ती मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण भागात जलसुरक्षा व पर्यावरण परिवर्तनांतर्गत मृद, जल व पर्यावरण यांचा समतोल राखून जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यात निवडण्यात आलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये जीआयएस आधारित नियोजन करण्याच्या अनुषंगाने मनरेगाअंतर्गत कामाचे योग्य नियोजन करण्याकरिता सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक यांची दोन दिवसीय कार्यशाळा पूर्ण करण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जलसुरक्षा व पर्यावरण परिवर्तन कार्यशाळेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
