संगमेश्वर:-भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून १३०० भाविक अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यापैकी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील २५० रामभक्तांना संधी देण्यात आली आहे त्या बसगाड्या आज दि.८ रोजी दुपारी २ वाजता देवरूखच्या भाजप कार्यालयातून रवाना झाल्या.
या रामभक्ताना शुभेच्छा देण्यासाठी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, विनोद मस्के, माजी नगरसेवक संतोष केदारी, सुशांत मुळे, बबन कीर्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील भाजपमार्फत २५० जण अयोध्येला रवाना
