रत्नागिरी:-येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे “समर्पण” नावाचे ॲप सुरू करण्यात आले असून त्याद्वारे कीर्तनसंध्या महोत्सवाच्या वर्गणीसह कोणत्याही मंदिरांना दान देण्यासाठीही या ॲपचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरीतील आर्यक सोल्युशनचे प्रशांत आचार्य आणि हृषिकेश सरपोतदार यांनी हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. या सुविधेचा वापर करणारा ‘कीर्तनसंध्या रत्नागिरी’ हा सर्वांत पहिला समूह आहे. येत्या ९ ते १३ मार्च या कालावधीत रत्नागिरीत हभप चारुदत्त आफळेबुवा यांच्या कीर्तनांची कीर्तनसंध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळवणे आणि वर्गणी पाठवणे यांसाठी नागरिकांना “समर्पण” ॲपचा वापर करता येणार आहे. कीर्तनातून समाज प्रबोधन आणि युवा पिढीवर योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न कीर्तनसंध्या परिवार २०१२ पासून करत आहे. हा कार्यक्रम आता समर्पण ॲपवर दाखल झाला आहे. समर्पणद्वारे ऑनलाइन एक दिवसाची किंवा पाच दिवसांची एकत्र देणगी सन्मानिका मिळविता येईल. ॲप अतिशय सुरक्षित आहे. ते इनस्टॉल केल्यावर गुगल अकाउंट नंबरवरून किंवा व्हॉट्स ॲप नंबरवरून रजिस्टर होता येईल. तेथे उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून कीर्तनसंध्या इव्हेंटमधून देणगी सन्मानिका तसेच देणगीची पावतीही मिळेल. ही सुविधा वापरायला अतिशय सोपी आणि तितकीच सुरक्षित आहे. एकदा रजिस्टर झाल्यानंतर कीर्तनसंध्या कार्यक्रमाविषयीच्या सूचनाही नियमित मिळतील.
याशिवाय निरनिराळी मंदिरे, संस्था, उपक्रम यांना प्रवेशिका, वर्गणी आणि धार्मिक कार्यासाठी लागणारे बुकिंग या अॅपद्वारे सहजरीत्या शक्य होणार आहे. घरबसल्या कोणत्याही मंदिराची वर्गणी या ॲपद्वारे देता येऊ शकेल.
ॲपच्या उद्घाटनाला रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कीर्तनसंध्या समूहाच्या वतीने अध्यक्ष अवधूत जोशी आणि सहकारी यांनी व्होकल फॉर लोकर या संकल्पनेवर आधारित रत्नागिरीतच तयार केलेल्या या अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. हे ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. त्यावर पेमेंट करण्यासाठी यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्डस, इंटरनेट बँकिंग इत्यादी पर्याय विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पेमेंट केल्यावर व्हॉट्स ॲप आणि ईमेलवर त्वरित पावती मिळणार आहे.
हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक – https:can.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri
हिंदुस्थान समाचार