रत्नागिरी:-कोकण इतिहास परिषदेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मानाचा जीवनगौरव पुरस्कार लोकमान्य टिळक वाचनालयाचे माजी अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कोकणविषयक पुस्तकांसाठी गोव्यातील किल्ले या महेश तेंडुलकर यांच्या पुस्तकाला परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोकण इतिहास परिषदेचे तेरावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवारी (दि. १० फेब्रुवारी) कणकवली कॉलेजमध्ये होणार आहे. कोकण इतिहास परिषेदच्या वतीने गतवर्षी सादर केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधास देण्यात येणारा स्व. रावसाहेब जाधव स्मृती पुरस्कार विवेक चारी यांच्या एन आर्टिस्ट कम्युनिटी इन गोवा या शोधनिबंधास आणि रेखा गोरे यांच्या सेंट जेरॉम कॅथेलिक चर्च इन काशीमिरा, ठाणे या निबंधास देण्यात येणार आहे. कणकवली कॉलेजने स्थानिक पातळीवर घेतलेल्या निबंध स्पर्धा, मोडीलिपी वाचन लेखन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यातील विजेत्यांना पुरस्कारांनी सन्मानित करणार आहे.