संगमेश्वर:-रामचंद्र सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड सप्रे विजेता ठरला.
भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या.
केजीएन सरस्वती फाउंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तर तांत्रिक सहकार्य चेसमेन रत्नागिरी संस्थेने केले. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या स्पर्धा झाल्या. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील फिडे मानांकित, बिगर मानांकित एकूण १११ खेळाडू सहभागी झाले.
स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडू गोव्याचा मंदार लाड याने आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत आठपैकी आठ गुण करत विजेतेपद पटकावले. त्याला रोख ११ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या सोहम खसबरदारने सात गुणांसह द्वितीय स्थान तर रवींद्र निकम यांनी साडेसहा गुणांसह आपले तिसरे स्थान निश्चित केले. त्यांना अनुक्रमे ९००० रुपये व ७५०० रुपये अशी रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, केजीएन सरस्वती फाउंडेशन व कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, सौ. ऋचा जोशी आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत ४० हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे, दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा विस्तृत निकाल असा : मुख्य बक्षिसे- मंदार लाड, सोहम खसबरदार, रवींद्र निकम, प्रवीण सावर्डेकर, अनंत गोखले, सार्थक साबळे, ऋषिकेश कबनूरकर, राहुल पवार, अथर्व तारवे, सौरीश कशेळकर, ऋषिकेश कुंभारे, विशाल आंबेकर, किरण पंडितराव, ओंकार कडव, यश गोगटे, विवेक जोशी, गोवर्धन वासावे, अभिषेक पाटील, सुश्रुत नानल आणि मिलिंद नरवणकर.
१३०१ ते १६०० फिडे मानांकन गट- प्रदीप कुलकर्णी, रोहित भागवत, माधव देवस्थळी, संतोष सारीकर, चैतन्य गावकर.
१००० ते १३०० फिडे मानांकन गट- मानस महाडेश्वर, सर्वेश नवले, मोहसिन सय्यद, साहिल बावधने, विठ्ठल मोरे.
बिगर मानांकित- राजेंद्र साळवी, मिलिंद सावंत, माधव काणे, शुभंकर सावंत, अभिजित जावळे.
१५ वर्षांखालील गट- अरिन कुलकर्णी, ज्योतिरादित्य गडाळे, हर्षवर्धन भिंगे, अथर्व अलदार, सात्त्विक मालणकर.
१३ वर्षांखालील गट- सिद्धी बुबने, अंशुमन शेवडे, अरिना मोदी, देवांश भाटे, विपिन सावंत.
११ वर्षांखालील गट- सहर्ष टोकाळे, स्पर्श लव्हाळे, आयुष रायकर.
९ वर्षांखालील गट – समर्थ गोरे, विहंग सावत, श्रीया बांदोकर.
७ वर्षांखालील गट – देवांग वैद्य.
१५ वर्षांखालील मुलींचा गट- निधी मुळ्ये.
१३ वर्षांखालील मुली – सान्वी दामले, रमा कानविंदे.
११ वर्षांखालील मुली- सांची चाळके. बेस्ट वेटरन्स- सुहास कामतेकर. रत्नागिरीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू- अमृत तांबडे, साहस नारकर.
रत्नागिरी १५ वर्षांखालील – आर्यन धुळप, सुतेज बेर्डे,
१३ वर्षांखालील- यश काटकर, हर्ष चव्हाण, ९ वर्षांखालील- अर्णव गावखडकर.