मुंबई – कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेने दररविवारी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे मुंबई ते चिपळूण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू ३१ मार्च पर्यत दर रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक ०११५७ पनवेल-रत्नागिरी अनारक्षित स्पेशल मेमू १ मार्च पर्यत दर रविवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे.
या गाड्यांना अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे स्थानकात थांबा दिला आहे.या अनारक्षित मेमू ८ डब्यांच्या आहेत.