चिपळूण:- तालुक्यातील शिरळ येथील प्रकाश व्यंकटेश साठे यांच्या बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या वासरावर काल रात्री एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. वासराने दूध प्यायल्यावर ते शिरेतून बाहेर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गायीच्या हंबरण्याने गोपालकाना जाग आली आणि लाईट लावल्यामुळे बिबट्या पळून गेल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
गोठ्याच्या पोटमाळ्यावरून बिबट्या गोठ्यात शिरला आणि वासरावर हल्ला केला.मात्र गोपालक व गायीच्या हंबरण्याने बिबट्या गोठ्याला लावलेली जाळी वाकवून गोठ्यातून बिबट्या बाहेर पडला. याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्याची माहिती साठे यांनी दिली शिरळ गावात बिबट्याचा संचार वाढला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चिपळूण तालुक्यातील शिरळ बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी
