राजन लाड / जैतापूर:-राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर लिखित सुनबाई तोऱ्यात च्या नाट्यप्रयोगाला हाउसफुल प्रतिसाद पाहायला मिळाला.
मुंबई शिवाजी नाट्य मंदिरात होणार आहे 25 फेब्रुवारीला याच नाटकाचा प्रयोग राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बाकाळे येथे श्री देव गणेश कृपा प्रसादिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुनबाई तोऱ्यात या नाटकाचा पहिला प्रयोग जि .प .शाळा बाकाळेच्या रंगमंचावर पार पडला.
बाकाळे सारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य चळवळ जोपासली जात असून दरवर्षी स्थानिक कलाकार एक नाटक सादर करत असतात.
यावर्षी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीच लिहिलेल्या सुनबाई तोऱ्यात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचंड गर्दी केली होती. नाट्यकलेची सेवा म्हणून दरवर्षी प्रेक्षकांना विनामूल्य नाट्यप्रयोग दाखविण्यात येतो.
या नाटकाचे दिग्दर्शन सुरेश चेऊलकर , संगीत सागर कणेरी सचिन कणेरी, रंगभूषा संतोष लिंगायत, ध्वनी आणि प्रकाश श्रीनिवास तारकर तर या नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन बाकाळे आणि काजुरमळी ग्रामस्थांनी केले होते यांनी केले होते. तर पत्रकार राजन लाड यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
या नाटकामध्ये सुरेश चेऊलकर, अजयकुमार रांबाडे, चेतन रांबाडे, केतन रांबाडे, रुपेश चव्हाण, महेंद्र पोवार ,प्रमोद पोवार सौ .मंजिरी कणेरी, सौ .चित्रा रांबाडे आणि कुमारी आकांक्षा पंगेरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
याच नाटकाचा प्रयोग बाकाळे स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवाजी मंदिर दादर मुंबई सुरुवात 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर आपल्या माडबन या गावी मुक्कामी आल्यापासून अगदी नवख्या असलेल्या स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटक साकारण्याबरोबरच स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना मुंबईतील भव्य नाट्यगृहात नेऊन हाउसफुल गर्दीत नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत ग्रामीण भागात ही नाटकाची चळवळ समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.