पाली:-वन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी १०.०० वा. दरम्यान पाली देवतळे नजीकच्या वळके गावातील नवी वसाहत येथील राजेंद्र शिवाजी दळवी यांच्या विहिरीमध्ये भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्या पडला असले बाबत युवासेनेचे पाली उपविभाग प्रमुख व किरणोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ खाके यांना याची माहिती मिळताच त्यांनी याबाबत वन विभागाला कळविले त्यानुसार तात्काळ सकाळी १०.३०वाजताचे दरम्याने रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन वन अधिकारी व कर्मचारी पोहोचले. जागेवरील पहाणी केली असता हा बिबट्या विहिरीमध्ये असलेल्या कपारीत बसलेला दिसून आला विहीर ही लोकवस्तीत आहे. श्री.दळवी यांच्या घराच्या जवळ असून ती १२ फूट व्यास चार फुट उंच कटडा ५० फूट खोल पक्की विहीर आहे.
या विहिरीमध्ये पिंजऱा दोरीच्या साहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने सोडण्यात आला आणि बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तरीही बिबट्या पिंजऱ्यात न आलेने पिंजरा वर घेऊन पिंजऱ्यामध्ये जिवंत कोंबडी ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा पिंजरा खाली सोडून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले त्यानंतर तब्बल चार तासाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले त्यानंतर बिबट्यास विहिरी बाहेर काढण्यात यश आले. पशुवैद्यकीय अधिकारी मालगुंड डॉ. स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेतली सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे तीन वर्ष आहे सदरचा मादी बिबट्या हा तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
त्यानंतर मा विभागीय वनाधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी व मानद वन्यजीव रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या ला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले . सदर रेस्कु वेळी प्रकाश सुतार ,न्हानू गावडे, प्रभू साबणे, मिताली कुबल तसेच ग्रामस्थ व रेस्क्यू टीमचे सोबत सागर तारी, दिनेश चाळके, समीर तारी, धनंजय चव्हाण, संतोष गराटे, अजित साळवी, सौरभ खाके, अमेय वेल्हाळ, सदानंद पवार, जयेश झरेकर, प्रशांत मावळणकर, याच बरोबर पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे उपस्थित होते. हे बचाव कार्य विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, निलेश बापट मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार,पाली परिमंडळ वन कार्यालयाचे वनपाल न्हानू गावडे , वनरक्षक प्रभू साबणे, जाकादेवी वनरक्षक मिताली कुबल ही यांनी रेस्कू कार्यवाही केली.