रत्नागिरी प्रतिनिधी: तालुक्यातील उक्षी येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्ता ओलांडणार्या अल्पवयीन मुलगा संकेत नरेश थापा (4,मुळ रा.नेपाळ सध्या रा.उक्षी,रत्नागिरी) याला धडक देत अपघात केला.अपघाताची ही घटना गुरुवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वा.घडली.
याप्रकरणी दुचाकी चालक प्रभाकर गोविंद पवार (54,रा.कापडगाव शिंदेवाडी,रत्नागिरी) वर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या विरोधात अरुण केशव देसाई (52,रा.उक्षी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,गुरुवारी सकाळी प्रभाकर पवार आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएफ-0872) घेउन उक्षी येथील अनिल सावंत यांच्या दुकानासमोरुन भरधाव वेगाने जात होता.त्याच सुमारास संकेत थापा हा अल्पवयीन मुलगा तेथ्ाून रस्ता ओलांडत असताना या भरधाव दुचाकीची धडक त्याला बसून हा अपघात झाला. यात संकेतच्या डोक्याला,हातांना तसेच डोळ्याला दुखापत झाली आहे.याप्रकरणी प्रभाकर विरोधात भादंवि कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.