संगमेश्वर: विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमांतर्गत मौजे कुडावले येथे उपस्थित शेतकऱ्यांना कृषीविषयक केंद्र व राज्य पुस्कृत योजना प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधान मंत्री अन्न प्रक्रिया योजना,, कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान,फळपीक विमा योजना, प्रधान मंत्री फसल विमा योजना, सेंद्रिय शेती आदी योजनांबाबत माहिती कृषी सहायक श्रीमती मर्चंडे यांनी दिली.तसेच मृद नमुने का घ्यावेत, त्याचे महत्व व कसे घ्यावेत याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ तसेच शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे धामापूर तर्फे देवरुख येथे विकसित भारत संकल्प यात्रेतंर्गत उपस्थित शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी पी बी कांबळे यांनी मागेल त्याला शेततळे, फळपिक विमा योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा इत्यादी योजनांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच श्रीमती भाताडे, ग्रामपंचायत पंचायत सदस्य, कृषी सहायक आर. बी यादव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.