नवी दिल्ली:-महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालानुसार राज्यात 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा असून राज्यातील 72% मत्स्य उत्पादन कोकण क्षेत्रात होते. कोकणतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत मत्स्य महाविद्यालय असून, मत्स्य विज्ञानात पदवी आणि पदव्युत्तर तसेच पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा नागपूर येथील पशु विज्ञान विद्यापिठाशी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री परशोत्तम रूपाला यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. या संबधीचा अतारांकित प्रश्न श्री अरविंद सावंत यांनी उपस्थित केला होता.
याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (सीआयएफई) या देशातील मत्स्य विज्ञानक्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहेत. त्या महाराष्ट्रासह देशात उच्च शिक्षण प्रदान करतात असे श्री रुपाला यांनी सांगितले.