चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पीटलचा अनोखा उपक्रम
चिपळूण:-पत्रकारांना दिवसभराच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन पत्रकारांसाठी चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पीटल येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित शिबीरातंर्गत कम्प्लीट ब्लड काऊंट, क्रिएटिनिन, रक्तातील साखरेची पातळी, लिपीड प्रोफाईल, ईसिजी चाचण्या करण्यात आल्या. यावेळी रुग्णालयाच्या डॉ रोहित केंबलकर तज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना नियमित तपासणी, औषधोपचार व पथ्यांविषयी मार्गदर्शन केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आपल्या पत्रकार मित्रांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सामाजिक दायित्व समजून चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलने त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतले. या शिबीराला शहरातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या शिबीराचा लाभ घेतला. हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबीरात डॉक्टरांनी पत्रकारांची तपासणी तसेच आरोग्यविषयक शंकाचे निरसन केले.
त्याचप्रमाणे या आयोजित शिबीरामध्ये पत्रकारांना तपासणी तसेच आरोग्यविषयक, आजारांबद्दल, आहार आणि दिनचर्या याबद्दल असणारे काही समज-गैरसमज अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक आजारांसंबंधीची भीती आणि शंका दूर होण्यास मदत झाली. यावेळी लाईफकेअर हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. इसहाक खतीब, डॉ समीर दळवी, डॉ शाहिद परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. लाईफकेअर हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी विविध समाजिक उपक्रम राबविले जातात. निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी या हॉस्पिटलच्या वतीने नियमित जनजागृती शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येतात आणि विविध माध्यमातून नि:स्वार्थपण रुग्णसेवा पुरविली जाते.