शालेय प्रशासकीय कामकाजासाठी व शिक्षक समस्या सोडवण्यासाठी देण्याचे शिक्षणाधिकारी यांनी केले मान्य
संगलट,खेड/इक्बाल जमादार:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांचे प्रयत्नाने रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे गट करून त्यासाठी अनुक्रमे खेड ,चिपळूण व राजापूर येथे प्रत्येक महिन्यातील एक दिवस शालेय प्रशासकीय कामकाजासाठी व शिक्षक समस्या सोडवण्यासाठी देण्याचे माननीय शिक्षणाधिकारी सौ सावंत मॅडम यांनी मान्य केले.
अध्यापक संघाची ही जुनी मागणी होती .त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व मा. नगराध्यक्ष श्री .वैभवजी खेडेकर यांनी जातीने लक्ष घालून ही मागणी मान्य करून घेतली. रत्नागिरी येथे शिक्षणाधिकारी कार्यालय मुख्यालयात वारंवार जाण्यास होणारा त्रास व त्यासाठीचा आर्थिक भुर्दंड, त्यासाठीची रजा ,यापासून शालेय कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे .
शिक्षणाधिकारी सौ. सावंत मॅडम यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यासंबंधीच्या तारखा जाहीर करणार असल्याचे सांगितले व प्रत्येक तालुक्यात पोहोचण्याचा व शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा मानस व्यक्त केला.
शालेय कर्मचाऱ्याची वरिष्ठ वेतन श्रेणी प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित बिले ,व अडचणी यासंबंधी सविस्तर चर्चा होऊन त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे मा. शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले.