चिपळूण/ओंकार रेळेकर:-श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्था गोशाळा यांच्यावतीने दिनांक २६,२७,२८ जानेवारी रोजी गोशाळा येथे संपूर्ण महाराष्ट्रातील भव्य दिव्य असे शेतकरी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती
कर्मवीर हरिभक्त श्री.भगवान महाराज कोकरे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
गाईंना शेतकऱ्यांची असलेली गरज आणि आज जे रासायनिकीकरणाकडे शेतकरी वळलाय तो कुठेतरी सेंद्रिय शेतीकडे वळावा याकरिता चांगल्या प्रकारची चळवळ महाराष्ट्रात उभी राहावी याकरिता शेतकरी महासंमेलन २६,२७,२८ जानेवारी या दिवशी येथे होणार आहे. अशी माहिती भगवान कोकरे महाराज यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली महाराष्ट्रातील गोप्रेमींना आंबा बागायतदारांना कोकणातील जनतेला आम्ही आव्हान करीत आहोत सदर संमेलनाला आपण उपस्थित रहावे गाईंचे वैज्ञानिक महत्त्व गायींचे शेती विषयक महत्व पंचगव्यातून होणारे फायदे या सर्वांची महती महाराष्ट्रातील सर्व तज्ञ मंडळी सांगणार आहेत शासनाचे काही प्रतिनिधी या संमेलनाला येणार असून महाराष्ट्र राज्य गोशाळा आयोगाचे प्रमुख श्री .शेखर मुंदडा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत ज्या शेतकऱ्यांना गाई सांभाळण्याची इच्छा आहे त्यांना बैल आणि गाई या ठिकाणी विनामूल्य स्वरूपात देण्यात येणार आहेत अशी माहिती श्री .संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्था गोशाळा लोटे परशुराम यांच्या वतीने श्री. भगवान महाराज कोकरे यांनी बुधवारी गोशाळेत आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.यावेळी वारकरी संप्रदायाचे संजय महाराज पाचपोळ उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम गोशाळा यांच्यावतीने शेतकरी महासंमेलनाचे आयोजन: भगवान कोकरे महाराज यांची माहिती
