रत्नागिरी:- फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नाॕलॉजी, एमआयडीसी, मिरजोळे रोड येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉालॉजीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, संस्था समन्वयक हेमंत चव्हाण तसेच आमंत्रित ज्युरी मेंबर्स आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र स्टूडेंट इनोवेशन चॅलेंज अंतर्गत जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत १४ नव उद्योजकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी नाविन्यता सोसायटीद्वारे निवडण्यात आलेल्या परीक्षकांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले.