क्रिकेट, धावणे, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरममध्ये झाली जोरदार चुरस
रत्नागिरी/प्रतिनिधी : इंडियन मेडिकल असोसिएशन रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. अतुल ढगे, डॉ. प्रज्ञा पोतदार, डॉ. अजिंक्य गांगण, डॉ. स्वाती गांगण, डॉ. सोनाली पाथरे यांनी आयोजनात सहभाग घेतला. रत्नागिरी शहरातील डॉक्टर्स आणि त्यांचे कुटुंबीय विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
रविवारी दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता डॉ.संतोष बेडेकर यांनी श्रीफळ वाढवून या स्पर्धाचे उदघाटन केले. यावेळी डॉ. निलेश शिंदे यांच्यासह डॉ. ढाकणे, डॉ विवेक पोतदार, डॉ श्रीखंडे, डॉ. सौ. श्रीखंडे, डॉ अमोल झोपे, डॉ शुभांगी बेडेकर, डॉ रवी गोंधळेकर, डॉ निकुंज भट्ट, डॉ विघ्नेश कदम, डॉ दीप्ती कदम, डॉ मतीन पारकर, डॉ अतुल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये आयएमएच्या सदस्य डॉक्टर्स आणि कुटुंबियांनी भाग घेतला. धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात डॉ योगेश सूर्यवंशी, महिला गटात विधी वैद्य, मुलांमध्ये ईशान सूर्यवंशी तर मुलींमध्ये त्विषा शिंदे हे सर्वजण विजयी झाले.
वॉकथॉन स्पर्धेत पुरुष गटात डॉ योगेश सूर्यवंशी, महिला गटात डॉ. सौ श्रीखंडे या विजयी झाल्या.
गोळाफेकमध्ये पुरुष गटात डॉ अतुल ढगे, महिला गटात डॉ तोरल शिंदे विजयी झाल्या. कॅरममध्ये डॉ निलेंद्र भोळे, बुद्धिबळ स्पर्धेत डॉ.श्रीखंडे यांनी विजयाची मोहोर उमटवली.
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात डॉ सौरभ भोळे, महिला गटात विधी वैद्य, मुलीमध्ये अस्मि झोपे तर मुलांमध्ये रुहान परकार हे विजयी झाले.
क्रिकेटमध्ये देसी डेविल्स संघाने ट्रॉफी पटकवली. यां संघात डॉ अतुल देशपांडे, डॉ मतीन परकार, डॉ शुभांगी बेडेकर, डॉ अश्विन वैद्य, आदित्य बेडेकर, डॉ श्रीविजय फडके यांचा समावेश होता. यात डॉ मतीन परकार हे सामनावीर झाले. विजयी स्पर्धकाला मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर आयएमए रत्नागिरी स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर म्हणून डॉ. योगेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. आपल्या वैद्यकीय व्यवसायातील ताण काहीकाळ बाजूला ठेवून सर्वच आयएमए सदस्यांनी या क्रीडा स्पर्धाचा आनंद लुटला.