चिपळूण/प्रतिनिधी : डीबीजे महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले गेले. सर्वप्रथम मंगेश तांबे यांनी ‘रोल ऑफ ओनर ‘या पोस्टरचे उद्घाटन केले. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन चेअरमन मंगेश तांबे व प्राचार्य डॉ.माधव बापट यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर स्पंदन रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी चेअरमन मंगेश तांबे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने यावेळी महाविद्यालयात विविध उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली वराडे व प्रा. सुनील भादुले यांनी केले. राष्ट्रगीताने व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.