संगलट,खेड/प्रतिनिधी:- भरणे समर्थ नगर येथील एकाची मोबाईल अॅप द्वारे १ लाख ८० हजार ची फसवणूक झाल्या प्रकरणी येथील पोलिसांकात एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना १० डिसेंबर रोजी घडली
यातील फसवणूक झालेली व्यक्ती टेलिग्राम या मोबाईल अॅपमध्ये vip212/5 mm 85892 cover reception या नावाच्या ग्रुपला जॉईन झाले होते. त्यामध्ये एक अनोळखी इसमाने एक लिंक पाठविली होती त्या लिंकला फिर्यादी यांनी ओपन करुन एक नवीन टेलिग्राम ग्रुपचे नाव 12.55 Shivkant Task / Settlement Payroll Group असे आहे या ग्रुपरील एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांना त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नं, बॅक डिटेल्स इ. माहीती मागितली असता त्यांनी ती माहिती अनोळखी इसमास देवुन त्यांने दिलेले तिन टास्क फिर्यादी यांनी खेळुन त्यांना २५० रु. पाठवून परत एक लिंक पाठवुन त्यांना काही वेळात पैसे जास्तीचे देतो असे आश्वासन देवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत १ लाख ८० हजाराची फसवणूक केली
या प्रकरणी अज्ञातवर भा द वि क ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ क, ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भरणेमधील एकाची १ लाख ८० हजाराची ऑनलाईन फसवणूक
